तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवारी (दि. १६) एकाच दिवशी तब्बल ३० उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात भारतीय जनता पक्षाकडून आठ, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे १८ आणि अपक्षाकडून चार अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली. रविवारी झालेल्या या मोठ्या अर्जवाढीमुळे निवडणूक रणसंग्रामाला वेग आला आहे. तळेगावातील उमेदवाराचे नाव व पक्ष पुढील प्रमाणे – प्रभाग क्रमांक एक – निखिल उल्हासराव भगत (भाजप), प्रभाग क्र. दोन – विभावती रवींद्रनाथ दाभाडे (भाजप), संदीप बाळासाहेब शेळके राष्ट्रवादी (अ ), प्रभाग क्र. तीन – सिद्धार्थ गोरख दाभाडे (राष्ट्रवादी), प्रिया विक्की लोखंडे (भाजप), प्रभाग क्र. चार – गणेश काकडे (राष्ट्रवादी), प्रभाग क्र. पाच – भारती धोत्रे (राष्ट्रवादी अ), संतोष भेगडे (राष्ट्रवादी अ), कौस्तुभ भेगडे (राष्ट्रवादी अपक्ष) – प्रभाग क्र. सात – सत्यम खांडगे (राष्ट्रवादी), स्नेहा खांडगे (राष्ट्रवादी), प्रभाग क्र. आठ – सुदाम शेळके (राष्ट्रवादी) प्रभाग क्र. नऊ – संजय बाविस्कर (राष्ट्रवादी), हेमलता खळदे (राष्ट्रवादी), सुदाम शेळके (राष्ट्रवादी), प्रभाग क्र. १० संगीता खळदे (राष्ट्रवादी), मजनू नाटेकर (राष्ट्रवादी), करुणा सरोदे (अपक्ष), चैतन्य पवार (राष्ट्रवादी), प्रभाग क्रमांक ११ – इंद्रकुमार ओसवाल (भाजप), मयूर टकले (अपक्ष), प्रभाग क्रमांक १२ – सोनाली दरेकर (राष्ट्रवादी), विनोद भेगडे (भाजप), स्वाती भेगडे (भाजप), प्रभाग क्र. १३ दीपक भेगडे (भाजप), प्रभाग क्र. १४ – अक्षता सातकर (अपक्ष)