Pune : वारजे परिसरात तब्बल १६ वाहनांची ताेडफोड
Updated On:

पुणे : वारजे परिसरात एका टोळक्याने पहाटे तीनच्या सुमारास तब्बल १६ चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळनगर भागात पहाटे तीन तरुण रस्त्याने पायी चालले होते. जाताना दिसेल त्या वाहनावर रस्त्यावर पडलेले दगड मारुन ते काच फोडत होते. त्यांनी अशा प्रकारे तब्बल सोळा वाहनांच्या काचा फोडल्या. यामध्ये टेम्पो, रिक्षा आणि व्हॅन यांचा समावेश होता.
या वाहनांचे मालक वाहने चालवून किंवा भाड्याने देऊन आपला उदरनिर्वाह करतात. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.





