नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या इटलीत असून तिथून त्यांनी देशवासियांसाठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी ट्विट करत आपण मान आणि सन्मानाने लढणाऱ्या शेतकऱ्यांसोबत आहोत असे ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान राहुल गांधी परदेशात असल्याने टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांना पुन्हा एकदा यानिमित्ताने त्यांच्यावर निशाणा साधण्याची संधी मिळाली आहे.
जब तक हिंदुस्तान के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी हैं तब तक आप निश्चिंत होकर घूम सकते है,एंजॉय कर सकते।
पार्टी हार्ड। https://t.co/gXlmYwskcB— Shandilya Giriraj Singh (@girirajsinghbjp) January 1, 2021
भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “जोपर्यंत नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत तोपर्यंत तुम्ही चिंता न करता फिरु शकता. आनंद लुटू शकता. पार्टी हार्ड”.
As the new year begins, we remember those who we lost and thank all those who protect and sacrifice for us.
My heart is with the farmers and labourers fighting unjust forces with dignity and honour.
Happy new year to all. pic.twitter.com/L0esBsMeqW
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 31, 2020
दरम्यान, राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये “नवीन वर्ष सुरु होत असताना ज्यांना आपण गमावलं आहे त्यांची आठवण काढत आहोत. तसंच ज्यांनी आपली सुरक्षा केली आणि बलिदान दिलं त्या सर्वांचे आभार मानत आहोत. मी मान आणि सन्मानाने अन्यायाविरोधात लढणाऱ्या शेतकरी आणि कामगारांसोबत आहे. सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा”. असे म्हटले होते.