‘कांतारा’ सुपरहिट होताच कन्नड स्टार ऋषभ शेट्टी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

मुंबई -‘कांतारा’ ने आपल्या उत्कृष्ट कथेसह, व्हिज्युअल्स आणि पॉवर-पॅक्ड परफॉर्मन्सने दर्शकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. दिवसेंदिवस या चित्रपटाला अधिक यश मिळत आहे. प्रेक्षकांचा या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत असून, दिग्दर्शक, लेखक आणि चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या ऋषभ शेट्टीला देखील दर्शकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. अशातच, ऋषभ शेट्टीने त्याच्या टीमसह मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली.
ऋषभ शेट्टीच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. देवस्थानी भेट देताना ऋषभ शेट्टीने पांढरा शर्ट आणि जीन्स परिधान केले होती. त्याच्या या साध्य आणि सिम्पल लूकमुळे फॅन्सने त्याचे कौतुक केले आहे. ऋषभ शेट्टी दर्शनासाठी आल्याचे समजताच त्याच्या चाहत्यांची मोठी गर्दी यावेळी झाल्याचे पाहायला मिळाले.
Thank You Mumbai 🙏❤️#Kantara @shetty_rishab @VKiragandur @hombalefilms @GeethaArts @gowda_sapthami @HombaleGroup @AJANEESHB #ArvindKashyap @actorkishore @KantaraFilm #KantaraTelugu #DivineBlockbusterKantara pic.twitter.com/Z3J0dK2K20
— Rishab Shetty (@shetty_rishab) October 30, 2022
बॉक्स ऑफिसवर कांतारा चित्रपट दिवसेंदिवस अधिक कमाई करताना दिसत आहे. IMDb द्वारे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भारतातील टॉप 250 चित्रपटांच्या यादीतही या चित्रपटाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. ‘कांतारा’ हा कला, संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा अपूर्व संगम दाखवणारा चित्रपट आहे.





