Actress Anya Singh : बॅालीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने दिग्दर्शित केलेली बॅड्स अॅाफ बॅालीवूड ही वेबसिरीज चांगलीच चर्चेत आहे. या वेबसिरीजमुळे आर्यन खानही चर्चेत आला आहे. या सिरीजमध्ये बॅालीवूड इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गज कलाकारांचे कॅमिओ आहेत. आर्यनच्या या सिरीजचं कौतुक केलं जात असून दुसरीकडे या सिरीजवरून टीकाही केली जात आहे. मात्र, आता आर्यनच्या दिग्दर्शनावरच प्रश्न उपस्थित केला जात आहे. खरंच त्यानेच ही सिरीज दिग्दर्शित केली आहे का? असा प्रश्न एका मुलाखती दरम्यान या सिरीजमध्ये भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीला केला असता तिने यावर स्पष्ट उत्तर दिलं. या सिरीजमध्ये अभिनेत्री आन्या सिंह हिची देखील प्रमुख भूमिका आहे. तिने साकारलेल्या पात्राचं कौतुक केलं जात आहे. अभिनेत्रीने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आर्यनचं भरभरून कौतुक केलं आहे. ज्यांना ही सिरीज आर्यनने दिग्दर्शित केली अशी शंका येते त्यांना अभिनेत्रीने फटकारलं आहे. काय म्हणाली आन्या सिंह? “मला वाटतं इतरांना खाली खेचण्यासाठी लोकांना फक्त एक संधी हवी असते. आर्यन कौतुकासाठी पात्र आहे कारण त्याने खरोखरंच सुंदर काम केलं आहे. त्याने या प्रोजेक्टवर खूप मेहनत घेतली आहे. सकाळी ७ पासून ते रात्री ११ पर्यंत त्याची एनर्जी कधीच कमी झाली नाही. तुम्ही त्याला कधीही थकलेलंही पाहणार नाही. त्याच्या चेहऱ्यावर कायमच स्माईल असते आणि कामावर लक्ष केंद्रित असतं”, असं अभिनेत्री आन्या सिंह हिने सांगितलं. या वेबसिरीजमध्ये शाहरुख, सलमान आणि आमिर तिघांचेही वेगवेगळे कॅमिओ आहेत. याशिवाय बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक राजामौली, करण जोहर, अर्शद वारसीही हे देखील आहेत. तर लक्ष्य लालवानी, राघव जुयाल, सेहर बंबा, आन्या सिंह, मनोज पाहवा, मोना सिंह आणि बॉबी देओल यांचीही मुख्य भूमिका आहे. या सिरीजचं लेखक आणि दिग्दर्शक या दोन्ही जबाबदाऱ्या आर्यन खानने सांभाळल्या आहेत. हेही वाचा : माजी आमदार सुनील टिंगरे पूरग्रस्तांसाठी सरसावले