‘आप’ला मोठा धक्का ! माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव ; भाजपच्या प्रवेश वर्मानी केले पराभूत

Arvind Kejriwal defeat । दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात प्रवेश वर्मा यांनी त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने प्रवेश वर्मा यांना तर काँग्रेसने संदीप दीक्षित यांना तिकीट दिले होते. या निवडणुकीत प्रवेश वर्मा यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय मिळवला आहे.
प्रवेश वर्मा यांनी केजरीवालांचा केला पराभव Arvind Kejriwal defeat ।
नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल पराभूत झाले आहेत. त्यांचा भाजपचे प्रवेश वर्मा यांनी त्यांचा ३१८६ मतांनी पराभव केला आहे. नवी दिल्ली विधानसभेची जागा दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि दिल्लीच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांमध्ये लढली गेली. शेवटी, विजय प्रवेश वर्माला मिळाला. प्रवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत. तर, संदीप दीक्षित हा दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे चिरंजीव आहेत.
केजरीवालांव्यतिरिक्त, सिसोदिया देखील हरले Arvind Kejriwal defeat ।
अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आम आदमी पक्षाच्या इतर अनेक मोठ्या नेत्यांना निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. मनीष सिसोदिया यांना जंगपुरा मतदारसंघातूनही पराभव पत्करावा लागला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना कठीण स्पर्धेचा सामना करावा लागत आहे आणि त्यांच्या पराभवाचा धोका आहे. आम आदमी पक्ष सत्तेत आला तर ते चौथ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री होतील, असे केजरीवाल यांनी निवडणुकीपूर्वी म्हटले होते. यासोबतच त्यांनी मनीष सिसोदिया यांना उपमुख्यमंत्री बनवण्याची घोषणा केली होती. तथापि, पक्षाच्या दोन्ही मोठ्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
ट्रेंडनुसार, आम आदमी पक्षाचाही निवडणुकीत पराभव झाला आहे. तथापि, बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. ट्रेंडमध्ये भाजप ४९ जागांवर आणि आम आदमी पक्ष २१ जागांवर आघाडीवर आहे.





