Arunachal Pradesh: पेमा खांडू पुन्हा मुख्यमंत्री बनणार की नेतृत्वबदल होणार, सस्पेन्स कायम
Updated On:

नवी दिल्ली –भाजपने अरूणाचल प्रदेशची सत्ता राखली. मात्र, त्या राज्यातील सरकार स्थापनेस बराच विलंब झाला आहे. त्यामुळे पेमा खांडू पुन्हा मुख्यमंत्री बनणार की नेतृत्वबदल होणार याविषयी सस्पेन्स निर्माण झाला आहे. आता भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची उद्या (बुधवार) बैठक होणार आहे. त्यामध्ये मुख्यमंत्र्याचे नाव निश्चित होईल.
संबंधित बैठकीला भाजपचे केंद्रीय निरीक्षक म्हणून ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद आणि तरूण चुघ उपस्थित राहणार आहेत. अरूणाचलमध्ये लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणूक झाली. त्या राज्यातील ६० पैकी ४६ जागा पटकावून भाजपने सत्ता राखली. लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी म्हणजे २ जूनला अरूणाचल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला.





