काँग्रेसचा जाहीरनामा हा देशाच्या एकतेसाठी धोकादायक – अरूण जेटली

नवी दिल्ली – काँग्रेस पक्षाने प्रसिध्द केलेल्या जाहीरनाम्यातील मुद्दे हे देशाचे तुकडे करणारे आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा देशाच्या एकतेसाठी धोकादायक आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी काँग्रेसवर केला आहे.

दिल्ली येथे काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, नेहरू-गांधी परिवारने जम्मू काश्मीर संबंधी जी ऐतिहासिक चूक केली होती, तोच अजेंडा आताची काँग्रेस पुढे नेत आहे.

काँग्रेसचं सरकार सत्तेत आल्यास भारतीय दंड संहितेमधील कलम 124 अ वगळू, असं आश्वासन जाहीरनाम्यातून देण्यात आलं आहे. कलम 124 अ देशद्रोहाशी संबंधित आहे. सीआरपीसी बदलण्याचं काँग्रेसने आश्वासन दिलंय ज्यामुळे जामीन देणं हा एक नियम होईल, दहशतवाद्यांनाही जामीन मिळेल, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांनाही अभय मिळेल.
देशद्रोह हा गुन्हा नसेल असं आश्वासन देणाऱ्या पक्षाला एकही मत मिळवण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया अरूण जेटली यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मुद्द्यावर दिली.

अतिरेकी आणि नक्षलवाद्यांना मदत करणारी आश्वासने काँग्रेसने दिलीत, असा गंभीर आरोपही जेटलींनी यावेळी केला आहे. दरम्यान, काँग्रेसने कधीच पूर्ण न होणाऱ्या केल्या आहेत. त्यांची ही आश्वासने कधीच अस्तित्वात येणार नाही, असंही जेटली म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.