हारजीत काय होतच असते मग ते राजकारण असो किंवा खेळ असो. एकदा हरलो म्हणून खचून जाण्यात काही अर्थच नसतो. राजकारणात पण असंच आहे एकदा एक निवडणूक झाली की पुढच्या निवडणुकीची तयारी करावी लागते व त्याची रणनीती आखावी लागते कारण प्रत्येक राज्याची समीकरण ही वेगवेगळी असतात. आता दिल्लीनंतर सगळ्या पक्षांचे लक्ष लागलय ते पश्चिम बंगाल कडे.
2026 मध्ये पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक होणार आहे. हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली एकामागून एक विजय प्राप्त केल्याने भाजपच्या अंगात जरा बळ संचारल आहे. ऑक्टोबर,नोव्हेंबर मध्ये बिहारच्या निवडणुका आहेत पण तिथली सगळीच गणित जरा वेगळी आहेत पण पश्चिम बंगालमध्ये भाजपला कमळ फुलवायचंय त्यादृष्टीने भाजपने आत्तापासून तयारी सुरू केली आहे.
ते म्हणतात ना की आधीच्या कामगिरीचा पुढच्या कामगिरीवर परिणाम होत असतो आणि हे तीन विजय भाजपसाठी खूप महत्त्वाचे होते. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये सत्ता आणण्यासाठी भाजपा आता जोरदार फिल्डिंग लावणार यात काही वादच नाही. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला आता थेट इशारा दिलाय.सुवेंदू अधिकारी म्हणाले, दिल्ली की जीत हमारी है अब बंगाल की बारी है असा इशाराच त्यांनी ममता बॅनर्जींना दिलाय.
पश्चिम बंगालमधील विरोधी पक्ष असलेला भाजप 2011 पासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांचे जे राज्य आहे ते संपुष्टात आणण्याचे ध्येय ठेवून आहे. 288 जागा असलेल्या राज्याच्या विधानसभेची पुढील वर्षी निवडणूक होणार आहे. 27 वर्षांनी दिल्लीवर भाजपने झेंडा फडकवला तसाच यंदा पश्चिम बंगालमध्ये पण फडकवण्याची शक्यता आहे. भाजपसोबत संघाची ताकद असणारच आहे. त्यामुळे 2011 पासून ची प्रतीक्षा या निवडणुकीत संपण्याची शक्यता आहे. सुवेंधु अधिकारी यांनी आपवर टीका करत ममता बॅनर्जींना इशारा दिलाय ते म्हणाले की दिल्लीतील आपत्तीचा शेवट झालाय आणि राष्ट्रीय राजधानीत राहणाऱ्या बंगाली लोकांनी भाजपला मतदान केलंय.
आपदा की विदाई हो गई है जनतेने आपला योग्य उत्तर दिले आता ममता दीदींची वेळ आहे. दिल्लीप्रमाणे आता बंगालमध्ये सुद्धा बदलाची वेळ आली आहे. बंगालमध्ये ही भाजपची लाट आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय तर दुसरीकडे काँग्रेसचे युवराज राहुल गांधी पश्चिम बंगालमध्ये पदयात्रेचा घाट घालणार आहेत. आता राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यातून विस्तवही जात नाही हे सर्वश्रुतच आहे पण राहुल गांधी बंगालमध्ये सक्रिय होत असल्याने पुन्हा एकदा ममतादीदी आणि राहुल गांधी हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
अशी एकंदरीत सगळी परिस्थिती आहे. कारण मित्रपक्ष जेव्हा एकमेकांच्या विरोधात लढतात उभे राहतात तेव्हा ते जास्त त्वेषाने लढतात म्हणजे हे दिल्लीत आपण पाहिले. आप आणि काँग्रेस ज्या पद्धतीने एकमेकांवर आरोप करत होते ते भयानक होतं. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीची जी गाडी होती ती भलतीच जोमात होती. काँग्रेसच्या अंगावर पण मूठभर मास चढलं होतं. मात्र लोकसभेनंतर काँग्रेसला हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला आव्हान देण्यासाठी राहुल गांधींची स्वारी आता बंगालच्या दारी निघाली आहे पण पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना त्रास देणे किंवा त्यांना आव्हान देणे हे केजरीवालांना त्रास देण्या इतके सोपं नाहीये. कारण क्रूरपणे सत्तेचा गाडा हाकणाऱ्यांमध्ये ममतादीदींचा समावेश होतो यावरूनच लक्षात येईल.
म्हणजे नाव ममता जरी असलं तरी वागणुकीत कुठेही ममत्व भाव वगैरे काही नाहीये. मागच्या विधानसभेच्या वेळेस आपण सगळ्यांनीच पहिले.अनेकांना आठवत असेल की मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता आणि भाजप कार्यकर्त्यांनी हिंसाचाराचा सामना करत 77 जागा मिळवल्या होत्या. इंडिया आघाडी ममता दीदींना आता नकोशी झाली. पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेसचे वर्चस्वच नाहीये त्यामुळे युती करण्याचा प्रश्नच येत नाही असं त्या जाहीरपणे सांगतात. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढणार आणि आम्ही जिंकणार ही त्यांची भूमिका आहे म्हणजे काँग्रेसला त्या उभं देखील करणार नाही.
अशा परिस्थितीत जर काँग्रेसने आव्हान दिलच तर यंदा काँग्रेस कार्यकर्त्यांना सुद्धा हिंसाचाराचा सामना करावा लागू शकतो. म्हणजे इंडिया आघाडीतील मित्रपक्ष वगैरे असं त्या काहीही बघणार नाही कारण तेवढ्या त्या क्रूर आहेत. आता अशी खबर आहे कि बंगालमध्ये राहुल गांधींची पदयात्रा आयोजित केली आहे. राज्य काँग्रेसला तसे आदेश सुद्धा देण्यात आलेत.
पण मागे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा बंगालमध्ये पोहोचली तेव्हा ममतादीदींनी त्यांना मुक्काम करण्यासंच नकार दिला होता. त्यामुळे आता तर ममता दीदी काय क्रूरपणा करतील हे सांगता येत नाही. ममतादीदींसाठी सुद्धा ही निवडणूक वाटते तितकी सोपी नाहीये म्हणजे काँग्रेस आणि भाजप दोन्हीचा आव्हान त्यांच्यासमोर आहे. काँग्रेसने खात जरी उघडलं नसलं तरी दिल्लीत जसं आपला फटका बसला तसा ममता दीदींना इथे बसू शकतो.
काँग्रेसच एक आहे स्वतः जिंकलो काय हरलो काय काही फरक पडत नाही. पण दुसऱ्याच्या कामात मोडता कसा घालायचा हे मात्र त्यांना येतं. म्हणजे हरियाणा, महाराष्ट्र,दिल्ली ही त्याची उदाहरणे आहेत. तसं पहिले तर गांधी परिवार सध्या सेफ आहे. कारण राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत त्यांची बहीण प्रियंका गांधी सुद्धा खासदार आहे. आई सोनिया गांधी राज्यसभेच्या खासदार आहे त्यामुळे त्यांना तसं काही फरक पडत नाही. पण काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील वादाचा फायदा हा भाजपाला होणार हे मात्र नक्की.
म्हणजे दिल्लीत भाजपने या आधी 8 जागांवरून आता थेट 45 जागांवर मजल मारली त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये सुद्धा भाजप 77 वरून मुसंडी नक्कीच मारू शकतो. आता ममता दीदींना सत्ता राखण हे काही सोप्प राहिलेलं नाहीये. पश्चिम बंगालच्या राजकारणात अजून बऱ्याच घडामोडी घडायच्या आहेत त्यामुळे आगे आगे देखो होता है क्या असं म्हणावं लागणार आहे. त्यामुळे ममता आपला गड राखणार कि भाजप आपला गड निर्माण करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.