Arshdeep Singh Troll for Carrying Girlfriend Bag : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि पंजाब किंग्सचा (PBKS) मुख्य अस्त्र मानला जाणारा अर्शदीप सिंग सध्या चर्चेत आहे. अर्शदीप मैदानातील कामगिरीपेक्षा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. नुकताच अर्शदीपचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात तो त्याची गर्लफ्रेंड समरीन कौर हिची बॅग खांद्यावर घेऊन चालताना दिसत आहे. अर्शदीपचा हा रोमँटिक अंदाज काही चाहत्यांना आवडला असला, तरी अनेक नेटकऱ्यांनी त्याच्यावर सडकून टीका केली आहे. मैदानात अपयश, बाहेर मात्र बॅगा उचलण्यात व्यस्त! (Arshdeep Singh Troll) अर्शदीपच्या ट्रोलिंगचे सर्वात मुख्य कारण म्हणजे आयपीएल २०२६ मधील त्याची निराशाजनक कामगिरी. या हंगामात त्याने आतापर्यंत १० सामन्यांत केवळ ११ विकेट्स घेतल्या आहेत, परंतु त्याची इकॉनमी १०.४२ इतकी राहिली आहे. एक फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून एवढ्या धावा खर्च करणे संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. Arshdeep Singh spotted at the airport with girlfriend Samreen Kaur. While Arshdeep is busy hauling all the luggage like a one-man porter service, Samreen casually walks alongside as if it’s a fashion week ramp. From leading India’s pace attack to becoming the designated airport… pic.twitter.com/cpGgOLwzbc — Brutal Truth (@sarkarstix) May 7, 2026 त्यामुळेच जेव्हा अर्शदीप विमानतळावर समरीनची बॅग उचलून फिरताना दिसला, तेव्हा संतापलेल्या चाहत्यांनी त्याला “पोर्टर सर्व्हिस” म्हणत डिवचले आहे. “मैदानावर धावा खर्च केल्यानंतर आता अर्शदीप ऑफ-फील्ड बॅगा उचलण्यात व्यस्त आहे,” अशा शब्दांत नेटकऱ्यांनी आपली भडास काढली आहे. पंजाबच्या पराभवामुळे रोष वाढला – (Arshdeep Singh Troll) Arshdeep Singh ko nauker banaker rakha hai uski gf samreen kaur ne😭 Where’s the equality ??pic.twitter.com/96a1jd5tQx — Lokesh Saini (@LokeshVirat18K) May 7, 2026 हंगामाच्या सुरुवातीला सलग ६ सामने जिंकून अव्वल स्थानावर असलेल्या पंजाब किंग्सची गाडी आता घसरली आहे. सलग ३ पराभवांमुळे संघाचे प्लेऑफचे स्वप्न धोक्यात आले असून, या घसरगुंडीसाठी गोलंदाजी विभागाला जबाबदार धरले जात आहे. अशा परिस्थितीत खेळाडूने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी प्रसिद्धीकडे जास्त लक्ष देऊ नये, असा सूर चाहत्यांमध्ये उमटत आहे. हेही वाचा -BCCI Strict Advisory : बीसीसीआयचा मोठा दणका! खेळाडूंच्या रुममध्ये जाण्यावर बंदी; ‘हनीट्रॅप’च्या धोक्यामुळे कडक नियम लागू कोण आहे समरीन कौर? Arshdeep Singh Troll : मैदानात धावांची खैरात अन् बाहेर गर्लफ्रेंडची बॅग! अर्शदीप सिंगवर चाहते भडकले; म्हणाले, “आता हेच काम… अर्शदीपची गर्लफ्रेंड समरीन कौर ही एक प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. काही काळापूर्वीच या दोघांनी आपल्या नात्याची अधिकृत कबुली दिली होती. त्यानंतर ते अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसतात. अर्शदीपने या टीकेवर सध्या मौन पाळले असून तो सरावावर लक्ष देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, जोपर्यंत अर्शदीप आपल्या गोलंदाजीने पुन्हा एकदा फलंदाजांच्या दांड्या गुल करत नाही, तोपर्यंत त्याचे ‘बॅग उचलणे’ सोशल मीडियावर चर्चेचा आणि टीकेचा विषय बनून राहील.