लोखंडी होर्डिंगची चोरी करणारे यांना अटक

लोणीकंद तपास पथकाची कारवाई ; दीड लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

वाघोली –  लोखंडी होर्डिंगची चोरी करणारे व  चोरीचा माल विकत घेणाऱ्या चार आरोपींना अवघ्या दोन दिवसात लोणीकंद तपास पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

अखलाख अब्दुलसलाम अहमद (वय २६, रा. केसनंद), रामशिष जयराम शर्मा (वय ३६, रा. केसनंद), सुनील एकनाथ उंद्रे (रा. उंद्रे वस्ती, कोलवडी) व बाबासाहेब जगनाथ लोणके असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे कोलवडी येथील शेतजमीनीत सुमारे दोन हजार किलो वजनाचे चार वर्षांपूर्वी उभारलेले लोखंडी होर्डिंग चोरून नेल्याप्रकरणी चंद्रकांत महादेव कुंजीर (रा. पारिजात सोसायटी, हडपसर) यांनी  लोणीकंद शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

कुंजीर यांच्या तक्रारीवरून लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार लोणीकंद तपास पथकाने तपास सुरु केला असता पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत चोरी गेलेल्या होर्डिंगचे केसनंद-कोलवडी रस्त्यावरील भंगाराच्या दुकानात स्क्रॅपमध्ये विक्री केली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

माहिती मिळताच लोणीकंद तपास पथकाने अखलाख अब्दुलसलाम अहमद (वय २६, रा. केसनंद), रामशिष जयराम शर्मा (वय ३६, रा. केसनंद) या भंगार घेणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुनील एकनाथ उंद्रे (रा. उंद्रे वस्ती, कोलवडी) व बाबासाहेब जगनाथ लोणके यांचेकडून घेतल्याची कबुली दिली.

लोणीकंद पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली. त्यांचेकडून १ लाख ५० हजार रुपये किंमतीचे दोन हजार किलो वजनाचे लोखंडी होर्डिंग जप्त करण्यात आले.
सदरील कामगिरी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख,

सहा. पोलीस आयुक्त किशोर जाधव, लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनायक वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे

सहा. पोलीस फौजदार वाळके, पोना कैलास साळुंके, अजित फरांदे, विनायक साळवे, पोशि समीर पिलाने, सागर कडू, बाळासाहेब हराळ, बाळासाहेब तनपुरे यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.