दोन तत्कालीन आयुक्ता विरोधात अटक वारंट
Updated On:

कोल्हापूर : महापालिका हद्दीतील अतिक्रमणे काढण्यात चालढकल आणि बांधकाम व्यावसायिकाला विनाकारण त्रास देणं महापालिका अधिकाऱ्यांना भोवलं आहे. कोल्हापूरच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकऱ्यांनी हा निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे कोल्हापूरच्या महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महापालिकेचे तत्कालीन दोन आयुक्त, सहाय्यक संचालक नगररचना, शहर अभियंता यांच्यासह 7 जणांच्या यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
कोल्हापूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, पी. शिवशंकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, तत्कालीन सहाय्यक संचालक नगररचना धनंजय खोत, मारुती राठोड, निवृत्त उपशहर अभियंता एस. के.माने, संजीव देशपांडे यांना अटक वॉरंट जारी झाले आहे.





