अभिनेता सोनू सूद विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?

Actor Sonu Sood | बॉलीवूड अभिनेता सोनू सुद गरजवंताच्या मदतीला अनेकदा धावून आला. कोविड काळात केलेल्या त्याच्या कार्याचे सर्वांकडून मोठे कौतुक करण्यात आले. मात्र सोनु सुदच्या अडचणीत वाढ झाल्याची बातमी समोर आली आहे. सोनू सूदविरोधात लुधियाना न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे.
एका फौजदारी खटल्यात साक्षीदार म्हणून अनेक वेळा समन्स बजावल्यानंतर देखील न्यायालयात तो हजर राहिला नाही. त्यामुळे गुरुवारी न्यायिक दंडाधिकारी रमणप्रीत कौर यांनी बॉलिवूड अभिनेता सोनू सूदविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
लुधियानाचे वकील राजेश खन्ना यांनी मोहित शुक्ला नावाच्या व्यक्तीविरुद्ध १० लाख रुपयांच्या फसवणुकीचा खटला दाखल केला होता. बनावट रीजिका नाण्यामध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने १० लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी दाखल केली. त्याच प्रकरणात वकील राजेश खन्ना यांनी फसवणुकीचा आरोप करत साक्ष देण्यासाठी सोनू सूदला बोलावण्यात आले.. मात्र अनेकदा न्यायालयीन समन्स बजावल्यानंतरही सूद त्याची साक्ष नोंदवण्यासाठी हजर राहिला नाही.
अखेर अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा पोलीस स्टेशनला पाठवलेल्या वॉरंटमध्ये सोनू सूदला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे की, ‘सोनू सूद यांना समन किंवा वॉरंट जारी करण्यात आले आहे, परंतु ते हजर राहण्यात अयशस्वी झाले आहेत. तुम्हाला सोनू सूद यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात येत आहेत.’ या प्रकरणाची पुढील सुनावणी १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. सध्या या प्रकरणात सोनू सूद किंवा त्यांच्या टीमकडून कोणतंही वक्तव्य करण्यात आलेलं नाही. Actor Sonu Sood |
सोनू सूदच्या वर्क फ्रंटबाबत बोलायचं झालं तर, अलिकेच तो ‘फतेह’ मध्ये दिसून आला. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाई करू शकला नाही. Actor Sonu Sood |
हेही वाचा:
‘मोदी-शाह हे शत्रू’, पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘हमास’ची दहशतवादी संघटनांसोबत बैठक, व्हीडिओ व्हायरल





