गॅल्वेस्टॉन (अमेरिका), दि. 15 – टेक्सास बॅंकेत मास्क घालण्यास नकार देणाऱ्या महिलेविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. मास्क न घातल्याबद्दल विचारणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला या महिलेने “काय करणार, अटक करणार का ?’ असे उघड आव्हानच टेरी राईट या ओरेगॉनमधील 65 वर्षीय महिलेने दिले होते.
गुल्वेस्टॉनमधील बॅंक ऑफ अमेरिकात गुरुवारी हे नाट्य घडले. बॅंकेतील ऑफिसर्स बॉडी कॅमेऱ्यात या महिलेने मास्क न घातल्याचे आढळून आले होते. बॅंक मॅनेजरने या महिलेविषयी पोलिसांकडे तक्रार केली. तिने पोलिसांचेही ऐकले नाही आणि तिला जायला सांगितले, तर तिने तेही ऐकले नाही.
म्हणून पोलिसांना कारवाईचा निर्णय घ्यावा लागला आणि तिच्याविरोधात अटक वॉरंट बजावण्यात आले. याशिवाय अटकेला विरोध करणे आणि गुन्हेगारी घुसखोरीचे आरोपही या महिलेवर लावण्यात आले आहेत.
टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग ऍबॉट यांनी बुधवारी मास्कची सक्तीचे आदेश मागे घेतले. मास्क घालावा की नाही, याबाबतचा निर्णय उद्योगांनीच स्वतः घ्यावा. कोविड-19 बाबतची काळजी नेमकी कशी घेतली जावी, याचा निर्णय स्थानिक पातळीवरच घेतला जावा, असे गव्हर्नरनी म्हटले आहे. मास्क बाबत स्थानिक उद्योगांनी स्वतःचे नियम कायम ठेवले आहेत.