Pune Crime: खुनाच्या प्रयत्नातील फरारी सराईतांना अटक; सहकारनगर पोलिसांची कामरिगी

पुणे – तरूणावर जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या सराईत त्रिकुटाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. करण ऊर्फ सनी रमेश रणदिवे (वय २३), अमर बारीकराव जाधव, (वय २५), कृष्णा पांडुरंग खिलारे (वय २५ सर्व रा. तळजाई माता वसाहत, पद्मावती ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विशाल दिलीप जाधव (रा. गुजरवाडी रोड) यांनी तक्रार दिली आहे.
खूनाच्या प्रयत्नतील आरोपींचा शोध घेताना आरोपी नातेवाईकांना भेटण्यासाठी धनकवडीत येणार असल्याची माहिती अंमलदार बापु खुटवड यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींवर यापुर्वी मारामारीचे गुन्हे दाखल असुन ते सराईत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कामगिरी उपायुक्त सागर पाटील, एसीपी सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई , पोलीस निरीक्षक युनुस मुलानी, पीएसआय सुधीर घाडगे, बापु खुटवड, महादेव नाळे, सुशांत फरांदे, भुजंग इंगळे, महेश मंडलिक, सागर शिंदे, प्रदिप बेडीस्कर, शिवलाल शिंदे, सागर सुतकर यांनी केली.





