रांजणगाव गणपती -येथील महागणपती मंदिरात भाद्रपद महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो; मात्र चालू वर्षी करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महागणपती मंदिरातील सर्व धार्मिक उत्सव बंद करण्यात आले आहेत. तरी ही या महोत्सवाच्या अनुषंगाने गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाने मंदिर परिसरात कटेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
रांजणगाव गणपती गावात आज पर्यंत करोनाचे 50 रुग्ण आढळून आले आहेत. यातील रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. मात्र यात्रा काळात भाविक दर्शनाला येऊन गर्दी करू शकतात. या सर्व बाबींचा विचार करता महसूल प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने मंदिर परिसरामध्ये गर्दी होणार नाही, यासाठी बंदोबस्त ठेवला आहे. 5 पोलीस अधिकारी व 40 पोलीस कर्मचारी तैनात केल्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितले.
बंदोबस्ताची पाहणी करण्यासाठी प्रांताधिकारी संतोष कुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, उपनिरीक्षक प्रफ्फुल्ल कदम, मंडलाधिकारी संतोष नलावडे, तलाठी सतिष पलांडे, पोलीस पाटील सारिका पाचुंदकर, सामाजिक कार्यकर्ते नामदेव पाचुंदकर व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.