बांधकाम कामगाराचा  गळा आवळून खून

पिंपरी – कामगारांमध्ये दुपारी झालेल्या किरकोळ भांडणांचा राग मनात धरुन एका कामगाराचा टॉवेलने गळा दाबून खून करण्यात आला. ही घटना म्हाळुंगे चौकाजवळ पुराणिक लेबर कॅम्प येथे गुरुवारी रात्री घडली. रवींद्र सोय (वय 26, रा. म्हाळुंगे, लेबर कॅम्प. मूळ रा. झारखंड) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत गिरीष उत्तम पेटाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी दिनेश महिमा प्रधान (वय 27, रा. म्हाळुंगे लेबर कॅम्प. मुळ रा. मयुरभंज, ओरिसा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र मूळचा झारखंडचा असून तो कामानिमित्त पुण्यात आला आहे. तो सुरेश गिरी या ठेकेदाराकडे काम करीत होता. म्हाळुंगे चौकाजवळ पुराणिक बिल्डरच्या एका बांधकाम साईटचे काम सुरु आहे. त्या साईटच्या लेबर कॅम्पमध्ये रवींद्र राहत होता. गुरुवारी दि. 2 मे रोजी दुपारी त्याचे त्याच साईडवरील बांधकाम कामगार दिनेश प्रधान याच्याशी त्याचे किरकोळ भांडण झाले होते. दुपारी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन रात्री दिनेश याने रविंद्र सोय याचा तोंड व गळा टॉवेलने आवळून त्याचा खून केला. आज शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव आंगज हे करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.