Jammu & Kashmir : लष्कराची मोठी कारवाई ! जम्मूत घुसखोरीचा कट उधळला दोन दहतशतवाद्यांचा केला खात्मा

श्रीनगर : पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला काही तास होत असतानाच भारतीय लष्कराने मोठी कारवाई केली आहे. जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर सुरक्षा दलांनी घुसखोरीचा कट उधळून लावला आहे. या कारवाईत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले आहे, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्याला २४ तासांपेक्षा कमी वेळात दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी उत्तर काश्मीर जिल्ह्यातील उरी नाला येथे काही संशयास्पद हालचाली लष्कराच्या निदर्शनास आला. बारामुल्ला येथील सीमा रेषावर तैनात असलेल्या जवानांना भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात व्यक्तींच्या हालचाली आढळल्या.
यानंतर सर्तक जवानांनी घुसखोरांना समर्पन करण्याचे आव्हान दिले. परंतु, घुसखोरांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या वेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, चकमकीच्या ठिकाणाहून दोन रायफल, एक चिनी पिस्तूल आणि १० किलो आयईडी आणि इतर युद्धसामग्री जप्त करण्यात आली आहे. तसेच दहशतवाद्यांची ओळख पटवली जात असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.





