Army Helicopter Crash : उत्तर काश्मीरमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, पायलट ठार
Updated On:

श्रीनगर – उत्तर काश्मीरमधील गुरेझ सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ आजारी बीएसएफ जवानांना घेण्यासाठी जात असताना लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर शुक्रवारी कोसळले, त्यात त्याचा पायलट ठार झाला आणि सहकारी जखमी झाला.
जखमी सहवैमानिकाला तातडीने लष्करी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी लॅंड करणार होते तेथे ते खराब हवामानामुळे उतरू शकले नाही. ते भरकटले गेले आणि कोसळले असे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमधील गुजरन नाल्याजवळ हा अपघात झाला.
तेथे अपघातग्रस्त भाग दुर्गम असल्याने तेथे बचाव पथके पायी पाठवण्यात आली आहेत. ठार झालेल्या वैमानिकाचे नाव आणि अन्य तपशील समजू शकला नाही.





