लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी फ्रान्सच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली – भारत आणि फ्रान्स यांच्यातील संरक्षण सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी चार दिवसांच्या फ्रान्सच्या अधिकृत दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. दिनांक २४ फेब्रुवारी रोजी जनरल द्विवेदी पॅरिसमधील लेझ इनव्हॅलिड्स येथे फ्रान्सच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी संवाद साधतील. ते जनरल पियरे शिल, फ्रेंच आर्मी चीफ यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा होतील.
या बैठकीचा मुख्य उद्देश दोन्ही देशांमधील लष्करी संबंध अधिक दृढ करणे आणि सामरिक सहकार्याचे नवे मार्ग शोधणे हा आहे. यानंतर इकोल मिलिटरै ही प्रतिष्ठित लष्करी प्रशिक्षण संस्था आणि लष्करी संकुल येथे ते भेट देतील, जिथे त्यांना फ्युचर कॉम्बॅट कमांड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली जाईल.
मंगळवारी जनरल द्विवेदी मार्सेल येथे फ्रेंच लष्कराच्या तिसऱ्या विभागाला भेट देतील. येथे त्यांना तिसऱ्या विभागाच्या प्रमुख जबाबदाऱ्या, त्यांची मोहीम आणि कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल. त्याचप्रमाणे, भारत-फ्रान्स दरम्यानचा शक्ती हा संयुक्त लष्करी सराव, संयुक्त प्रशिक्षण उपक्रम, तसेच फ्रेंच लष्कराच्या आधुनिकीकरण प्रकल्प (स्कॉर्पियन) यासंदर्भातही त्यांना माहिती दिली जाईल.
याशिवाय जनरल द्विवेदी स्कॉर्पिअन विभागाच्या अत्याधुनिक युद्धनीतीचे थेट प्रात्यक्षिकाचे प्रात्यक्षिक देखील बघणार आहेत. जनरल द्विवेदी सीओएएस न्यूवे चॅपल इंडियन वॉर मेमोरियल येथे भेट देऊन पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना आदरांजली वाहतील.





