मुंबई : सध्या आयपीएल सुरु असून सगळे सामने रंगतदार होताना दिसत आहेत. आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) मुंबई इंडियन्सने 30 लाख रुपयांना विकत घेतलं. मात्र अर्जुनला आतापर्यंत या सिझनमध्ये एकही सामना खेळता आलेला नाही. यादरम्यान अर्जुन तेंडुलकरने आपल्या चाहत्यांना एक भावनिक आवाहन केले आहे. अर्जुनची ही पोस्ट पाहून चाहतेही भावुक झाले आहेत. काय लिहिले पोस्टमध्ये? अर्जुन तेंडुलकरने भोलू नावाच्या श्वानाच्या पिल्लाचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. भोलूच्या आईचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे त्याला घराची गरज आहे. भोलू 45 दिवसांचा आहे, असं म्हणत अर्जुनने मदतीचं आवाहन केलं आहे. भोलू सध्या ज्यांच्या घरात राहत आहे त्यांना पशू पालनाचा कोणताही अनुभव नसल्याचंही अर्जुन म्हणाला आहे. कशी आहे अर्जुन तेंडुलकरची कारकीर्द ? आयपीएलमध्ये अर्जुनने आतापर्यंत फक्त 5 मॅच खेळल्या आहेत, यात त्याने 3 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय बॅटिंगमध्ये त्याने फक्त 13 रन केल्या आहेत. आयपीएलच्या या 5 मॅच अर्जुनने आयपीएल 2023 मध्ये खेळल्या आहेत. गोव्याकडून खेळण्याचा निर्णय अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) प्रथम श्रेणी क्रिकेट गोव्याकडून खेळत आहे. मुंबईकडून खेळण्याची संधी मिळत नसल्यामुळे अर्जुनने गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे.