“अर्जुन रेड्डी’मुळे प्रसिद्धी मिळाली -शालिनी पांडे

साउथ स्टार विजय देवरकोंडाच्या “अर्जुन रेड्डी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला नुकतेच चार वर्षे पूर्ण झाले आहे. यात विजयसह शालिनी पांडेने मुख्य भूमिका साकारली होती. शालिनी पांडे लवकरच रणवीर सिंहसोबत “जयेशभाई जोरदार’ या बिग बजेट चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. “अर्जुन रेड्डी’ चित्रपटामुळे शालिनी रातोरात साउथची स्टार बनली. या चित्रपटाला 4 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शालिनी म्हणाली, या चित्रपटामुळे आणि डायरेक्टर संदीप रेड्डी वांगा यांनीच मला एक कलाकार म्हणून संधी दिली आणि चाहत्यांना माझा
परफॉर्मन्स आवडला. शालिनी पांडे म्हणाली, “अर्जुन रेड्डी’मुळेच मी या शिखरावर पोहोचू शकले. कारण या चित्रपटानेच मला खऱ्या अर्थाने कलाकार म्हणून जगभरात प्रसिद्धी मिळविता आली.
मी माझा परफॉर्मन्स चांगला करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले आणि चाहत्यांनीही त्याचे कौतुक केल्याने मला आनंद असल्याचे तिने सांगितले.एक कलाकार म्हणून मला आज जे यश मिळाले आहे, त्याबद्दल मी दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांची खूप खूप आभारी आहे.
मला अभिमान आहे की, यासारख्या एका अतुलनीय प्रेमकथा सादर करताना त्यात माझा वाटा होता. दरम्यान, हा चित्रपट 25 ऑगस्ट 2017 रोजी प्रदर्शित झाला होता.





