अर्जुन रामपालने ठेवली आपल्या प्रेयसीसाठी बेबी शॉवर पार्टी

मुंबई-  बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपालने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये त्याची दक्षिण आफ्रिकन प्रेयसी ‘गॅब्रिला डेमोट्रिएड्स’ गर्भवती असल्याचे अर्जुनने सांगितले होते. त्यानंतर आता नुकतीच गॅब्रिएलाची बेबी शॉवर पार्टी पार पडली. यामध्ये अर्जुन आणि गॅब्रिएलाचे काही जवळचे मित्र-मैत्रिण सहभागी झाले होते. या पार्टीसाठी गॅब्रिएला आणि अर्जुनने एकसारख्या रंगाच्या कपड्यांची निवड केली होती. तसेच, पार्टीची सर्व तयारीही अर्जुनने स्वतः केली होती. खरं तर काही दिवसांपूर्वी अर्जुनची पहिली पत्नी मेहर जेसिया ही पार्टी ऑर्गनाइज करेल अशी चर्चा होती. सध्या सोशल मीडियावर गॅब्रिएलाच्या बेबी शॉवर पार्टीचे फोटो जोरदार व्हायरल होत आहे.

अर्जुनला मायरा (वर्ष १३) आणि महिका (वर्ष १६) या दोन मुली आहे. अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर जेसियांचा २०१८ मध्ये घटस्फोट झाला होता. त्यानंतर अर्जुन आपली प्रेयसी गॅब्रिला डॅमॉट्रिएड्स सोबत लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.