Arjun Rampal | अभिनेता अर्जुन रामपालचे सध्या ‘धुरंधर‘ या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे त्याने आपल्या खासगी आयुष्यातील मोठा खुलासा केला आहे. गेली सहा वर्षे ‘लिव्ह-इन’ रिलेशनशिपमध्ये असलेल्या अर्जुन रामपालने अखेर त्याची प्रेयसी गॅब्रिएला डेमिट्रिएड्ससोबत साखरपूडा केला आहे. अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला डेमिट्रिएड्स यांनी अलीकडेच अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या दरम्यान अर्जुन रामपालने साखरपूडा केल्याचा मोठा खुलासा केला. रिया चक्रवर्तीनं शेअर केलेल्या प्रोमोमध्ये अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स सांगते की, “आम्ही अजून लग्न केलेले नाही.” तेवढ्यात अर्जुन रामपाल म्हणतो की, “पण आमचा साखरपुडा झालाय. आम्ही तुम्हाला तुमच्या शोमध्ये हे सांगत आहोत.” लग्नाआधीच दोन मुलं अर्जून आणि ग्रॅब्रिएला यांना लग्नाआधीच दोन मुलं आहेत. गॅब्रिएलाने जुलै २०१९ मध्ये मुलगा एरिकला जन्म दिला. त्यानंतर ४ वर्षांनी, २०२३ मध्ये गॅब्रिएलाने दुसऱ्या मुलगा एरिवला जन्म दिला आहे. आता ६ वर्षांच्या नातेसंबंधानंतर हे जोडपे लवकरच लग्न करू शकतात.गॅब्रिएला अर्जुनपेक्षा तब्बल १४ वर्षांनी लहान आहे. यापूर्वी अर्जुन रामपालनं मॉडेल मेहर जेसियाशी १९९८मध्ये लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या २० वर्षांनंतर त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. या जोडप्याला मायरा आणि महिका या दोन मुली आहेत. हेही वाचा : निलेश साबळे आणि भाऊ कदमचे दणक्यात पुनरागमन; पुन्हा झी मराठीवर झळकणार