Arjun Kapoor And Malaika Arora | अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मात्र मागील वर्षी दोघांचे ब्रेकअप झाले. ज्यानंतर चाहत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता मलायकाच्या एका पोस्टमुळे हे दोघे पुन्हा एकत्र आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. इनस्टाग्रामवर १५ जून रोजी मलायका अरोराने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये ती नाईट-सूट घालून बाल्कनीत बसलेली दिसत आहे. याशिवाय तिने खाण्यापिण्याचे फोटोही शेअर केले. फोटोंमध्ये तिचा नो मेकअप लूक दिसत होता. फोटोंमध्ये मलायकाने व्हाईट हार्ट बनवले आहे. अर्जुन कपूरने हे फोटो लाईक केले आहेत. ज्यावरून सोशल मीडियावर त्यांच्या पुन्हा एकत्र आल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे. Arjun Kapoor And Malaika Arora | दरम्यान, मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले होते. त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2019 मध्ये मलायका आणि अर्जुन यांनी आपल्या नात्याचा स्वीकार केला. गेल्या 8 वर्षांपासून मलायका-अर्जुन एकत्र होते. परंतु आता दोघांचे ब्रेकअप झाले आहे. Arjun Kapoor And Malaika Arora | हेही वाचा: हृदयद्रावक दुर्घटना…! दर्शनापूर्वी गोदावरी नदीत स्नानाला गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 तरुणांचा बुडून मृत्यू