#FIHProLeague | आघाडीनंतरही भारतीय महिलांचा पराभव; अर्जेटिनाने पटकावले विजेतेपद
Updated On:

रॉटरडॅम – एफआयएच प्रो लीग हॉकी स्पर्धेत महिला गटात भारतीय संघाला एक गोलच्या आघाडीनंतरही पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात बलाढ्य अर्जेटिना संघाने भारताचा 3-2 असा पराभव केला व विजेतेपदाला गवसणी घातली.
अर्जेटिनाने हे विजेतेपद साकार करताना 16 सामन्यांतून 42 गुणांची नोंद केली. पुरुष गटाचे विजेतेपद मिळवलेल्या नेदरलॅंड्सला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
भारताने यंदा या स्पर्धेत पदार्पण करताना 12 सामन्यांत 24 गुणांसह तिसरे स्थान मिळवले. भारताने यापूर्वी शनिवारी झालेल्या सामन्यात अर्जेटिनाला शूटआऊटमध्ये 2-1 असे पराभूत केले होते. औपचारिकता उरलेल्या स्पर्धेत भारतीय संघाला आता अमेरिकेविरुद्ध दोन सामने खेळावे लागणार आहेत.

