हेलसिंकी – गेल्या काही वर्षांमध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा फटका संपूर्ण पृथ्वीलाच बसत आहे पृथ्वीवरील जमिनीपेक्षा ही आर्क्टिक प्रदेशातील तापमानात तब्बल चौपट वेगाने वाढ होत असल्याचा निष्कर्ष नुकताच समोर आला आहे पृथ्वीवरील बर्फमय आणि सर्वात थंड प्रदेश म्हणून ज्या प्रदेशाचे वर्णन केले जाते त्या आर्टिक प्रदेशाला ग्लोबल वार्मिंगचा सर्वात जास्त फटका बसत असल्याचे गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात म्हटले आहे.
गेल्या चाळीस वर्षांमध्ये आर्क्टिक प्रदेशातील तापमानात चौपट वेगाने वाढ झाल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे नॉर्वे आणि फिनलंडमधील काही शास्त्रज्ञांनी 1979 पासूनचा डाटा जमा केला असून या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे प्रत्येक 10 वर्षांच्या कालावधीमध्ये आर्क्टिक प्रदेशाचे तापमान पाऊण टक्क्यांनी वाढत आहे तापमानवाढिचा हा वेग पृथ्वीवरील इतर प्रदेशांच्या तुलनेत तब्बल चौपट आहे.
आर्क्टिक प्रदेशातील तापमानात वाढीचा वेग दुप्पट असेल असे मानण्यात येत होते पण नेचर अँड एन्व्हायरमेंट नावाच्या या मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखाप्रमाणे हा वेग तब्बल चौपट आहे पृथ्वीवासीयांसाठी चिंता निर्माण करणारी गोष्ट ही आहे की आर्क्टिक प्रदेशात काही ठिकाणी तापमान वाढीचा हा वेग तब्बल सात पट आहे.
त्यामुळे बर्फ वितळून समुद्राच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे आर्क्टिक प्रदेश जो ग्रीनलँड आईस शीट म्हणून ओळखला जातो त्यामध्ये एवढे बर्फ युक्त पाणी आहे की ते जर वितळले तर समुद्राची पातळी तब्बल सहा मीटरने वाढू शकते