Krishna Mahadik Meet Rinku Rajguru : ‘सैराट’ चित्रपटातून एकाच रात्रीत प्रकाशझोतात आलेली आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. रिंकू राजगुरूचा सोशल मीडियावर फार मोठा चाहतावर्ग आहे. तिला चाहते रिंकू नाही तर, आर्ची नावानेच ओळखतात. आर्चीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
तिच्या चित्रपटांप्रमाणे तिचं वैयक्तिक आयुष्यही कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतं. अशातच आता पुन्हा एकदा रिंकू चाहत्यांमध्ये चर्चेत आली आहे. इन्स्टाग्रामवर काही तासांपासून एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे रिंकूचं लग्न ठरतंय का? असा प्रश्न सध्या चाहते विचारताना दिसत आहेत. रिंकू राजगुरू हिने इन्स्टाग्रामवर भाजपा खासदार धनंजय महाडिकांचा मुलगा कृष्णराज महाडिकांसोबत एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो इतका व्हायरल झाला आहे कि, चाहते वर्गामध्ये जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
अभिनेत्री रिंकू राजगुरू हीचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोत ती राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे धाकटे चिरंजीव युट्युबर आणि उद्योजक कृष्णराज महाडिक याच्यासोबत दिसतेय. कृष्णराज युट्युबवर क्रिश महाडिक म्हणून लोकप्रिय असून त्यांचे फॉलोवर्स कोटींमध्ये आहेत. युट्यूबवरील त्याच्या व्हिडीओला अनेकांची पसंती मिळते. त्याच्या व्हिडीओवर अनेकदा कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळतं. अशातच त्यांनी आता अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि त्यांचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
रिंकू सध्या कोल्हापूरात आहे. तिने कोल्हापूरला गेल्यानंतर करवीर निवासीनी अंबाबाईचे दर्शन घेतले आहे. तिने देवीचे दर्शन कृष्णराज महाडिक यांच्यासोबत घेतले आहे. कृष्णराज महाडिक युट्यूबर असून त्यांच्या कार्यालयाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून रिंकूचा आणि कृष्णराज महाडिक यांचा फोटो शेअर करण्यात आलेला आहे. शेअर केलेल्या त्या फोटोला “आज अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूर येथे आल्या आणि त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले…” असं कॅप्शन देण्यात आलेले आहे. हा फोटो काही मिनिटातच व्हायरल झाला असून त्यावर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करण्यात आला.
चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव
कृष्णराज महाडिक आणि रिंकू राजगुरूचा एकत्र फोटो पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. अनेकांनी तर कमेंट करून थेट दोघांचं अभिनंदन करायला सुरुवात केलीय. तर, रिंकू राजगुरूसोबत लग्न ठरलंय का? असा थेट प्रश्नही काही चाहत्यांनी कृष्णराज महाडिक यांना विचारलाय. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरासमोर हा फोटो काढल्यानं दोघांचं ठरलं का? लग्न करण्याचा विचार आहे की काय? मग कधी आणि कसं जुळलं? असे प्रश्न चाहते कमेंट करून विचारत आहेत.
दरम्यान, नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. अशातच कामानिमित्त कोल्हापुरात आलेल्या रिंकू राजगुरूनं करवीर निवासिनी महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. नेमकं त्याचवेळी कृष्णराज महाडिक देवीच्य दर्शनासाठी मंदिरात आले आणि दर्शनावेळी दोघांची भेट घडून आली. कृष्णा महाडिक यांनी रिंकूसोबत फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर करताच या चर्चेला उधाण आलं आहे.