पुणे : डायसप्लॉट आणि अमीना टॉवर भागातील पायाभूत सुविधांचा विकास आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपालाच कौल द्यावे, असे आवाहन प्रभाग क्रमांक २२ क मधील भाजपच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी या भागातील नागरिकांना केले. पाटील यांनी शुक्रवारी भागातील डायसप्लॉट आणि अमीना टॉवर परिसरात घरोघरी प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी स्थानिक नागरिकांकडून, विशेषतः महिलावर्गाच्या समस्या जाणून घेत महापालिकेच्या माध्यमातून ते सोडविण्य़ाचे आश्वासन दिले. तसेच, या परिसराच्या सर्वांगीन विकासासाठी महापालिकेत पुन्हा संधी दिल्यास या भागातील समस्या सोडविण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी काढण्यात आलेल्या पदयात्रेत ठिकठिकाणी अर्चना पाटील यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावेळी स्थानिक भाजप पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे. नागरिकांचे प्रेम आणि विश्वास पाहुन माझा उत्साह द्विगुणित झाला असून, हा विजय विश्वासाचा आणि विकासाचा असेल. अर्चना पाटील ( उमेदवार, प्रभाग २२)