मुंबई – जगातील सर्वात तरुण गायक अब्दू रोजिक सर्वांचा आवडता बनला आहे. बिग बॉसमध्ये अब्दूला पाहून लोकांना खूप मजा येत आहे. अब्दूच्या गोंडस आणि मनमोहक शैलीमुळे चाहते इम्प्रेस झाले आहेत.
अशातच बिग बॉसमध्ये अब्दुची खिल्ली उडवणाऱ्या अभिनेत्री अर्चना गौतमची क्लास लगावला आहे. शोच्या भव्य प्रीमियरच्या दिवशी, जेव्हा सर्व स्पर्धक घरात प्रवेश केल्यानंतर लिविंग रूम बसले होते, तेव्हा अर्चनाने अब्दूच्या लहान उंचीची खिल्ली उडवली.
Hey #biggboss premiere ke din hi kisiko nikalne ka koi scheme hai kya ?? Pls #archanagoutham ko nikalo kan se khoon nikal diya abh dimaag v khrp kr rha hai.#BiggBoss16 #BB16 #abdurozik .pic.twitter.com/hv4RZs1Cju
— ★RJUN (@MrObhodro) October 1, 2022
अर्चनाने अब्दूच्या उंचीची चेष्टा केली आणि म्हणाली,’अरे, मला ते दिसत नाही. अर्चना असेही म्हणते की तिने वेगळा बेड घेतला हे चांगले झाले नाहीतर मध्यरात्री कोणीतरी लाथ मारली असती. हे बोलल्यावर अर्चना जोरजोरात हसायला लागते.’
मात्र, अब्दूला अर्चनाचे शब्द नीट समजू शकले नाहीत, कारण तिला फारसे हिंदी येत नाही. मात्र लहानपणापासूनच अब्दूच्या उंचीची खिल्ली उडवल्यामुळे लोक अर्चनावर भडकले आहेत आणि तिला शिष्टाचारात राहण्याच्या सूचना देत आहेत. अर्चनाला शोमधून बाहेर काढावे, अशी मागणीही अनेक यूजर्सनी सुरू केली आहे.
एका यूजरने अर्चनाला फटकारले आणि म्हटले,’हे दयनीय आहे. विचित्र दिसते. कधी उंचीची चेष्टा करत, कधी गोदीत उचलून. अर्चनाने अब्दूला जशी वागणूक दिली तशीच ती कुटुंबातील इतर सदस्यांशी वागते.’