एप्रिल फूलच्या कॉलना “ट्रू’ कॉलरचा चाप

आकुर्डी – एप्रिल फुलला केवळ मित्र-मैत्रीण व नातेवाईकांना खोटे बोलून फसविण्याची अथवा टिंगल करण्याची प्रथा जुनीच. परंतू गेल्या काही वर्षांत काही महाभाग प्रशासकीय यंत्रणांनाच 1 एप्रिल दिवशी फुल करून वेठीस धरण्याचा प्रकार करत होते. पोलीस मदतीचा क्रमांक, अग्नीशामक दल यासारख्या महत्त्वाच्या यंत्रणांची फेक कॉलमुळे धावपळ उडायची. यंदा मात्र 1 एप्रिल रोजी एकही फेक कॉल न आल्यामुळे या यंत्रणांमध्ये समाधान आहे. हे सर्व “ट्रू’ कॉलरमुळे शक्‍य झाले असून फेक कॉलला चाप बसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

एप्रिल फुल बनविण्यासाठी काहीजण पुर्वी अग्निशामक दल, पोलिसांचा शंभर नंबरचा क्रमांक, रेल्वे मदतीचा क्रमांक, महापालिका प्रशासनाकडून नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेला मदतीचा क्रमांक यावर कॉल करून खोटी माहिती देवून या यंत्रणांची धावपळ उडवित होते. पुर्वी आलेला फोन हा कोणत्या क्रमांकावरून आला ही सुविधा उपलब्ध नव्हती. परंतू गेल्या दोन वर्षांपासून “ट्रू’ कॉलरची सुविधा उपलब्ध झाली आणि फेक कॉल येणे बंद झाले. गेल्यावर्षीपर्यंत असे कॉल येत होते. “ट्रू’ कॉलरची यंत्रणा सुरू होण्यापूर्वी इतरही दिवशी असे कॉल येत असल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले. कॉल आल्यानंतर कर्मचारी वाहनांसह घटनास्थळी जात होते, मात्र त्या ठिकाणी कोणतीच दुर्घटना झाली नसल्याचे उघड झाल्यानंतर माघारी फिरावे लागत होते. त्यामुळे वेळ आणि श्रम वाया जात होते.

क्रॉसचेक करण्याची यंत्रणा नसल्यामुळे हे महाभाग यंत्रणेला वेठीस धरत होते. मात्र “ट्रू’ कॉलरची सुविधा आली आणि फेक कॉल कमी झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हाच अनुभव पोलिसांचाही होता. अगदी मारामारीपासून गोळीबार झाल्याचेही फोन पोलिसांकडे येत होते. त्यामुळे पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांचीही चांगलीच धावपळ होत होती. दोन्ही विभाग हे संवेदनशील असल्याने फोन आल्यानतर प्रतिक्रीया देणे हे अनिवार्य असते, कारण हा नागरिकांच्या जिवशी निगडीत घटना असतात. मात्र याचा नागरिकच गैरफायदा घेत असल्याने संबंधीत यंत्रणांना त्रस्त झाल्या होत्या.

पूर्वी लॅन्डलाईन असल्यामुळे कोण कोठून फोन करत आहे हे कळत नव्हते. तसेच शहरपरिसरात एसटीडी व कॉईन बॉक्‍सचाही फेक कॉलसाठी वापर केला जात होता. मात्र गेल्या काही दिवसांत ूमोबाईला वापर वाढला तसेच “ट्रू’ कॉलरची यंत्रणाही अस्तित्त्वात आल्यानंतर फेक कॉलच्या प्रकारात मोठा फरक पडला. येणारा कॉल कोठून आला, कोणी केला, त्याचा नंबर काय? या सर्व बाबी आता स्पष्ट होत असल्याने तसेच असा प्रकार करणाऱ्याविरोधात कठोर कारवाईही करण्यात येत असल्याने फेक कॉलचे प्रकार संपुष्टात आले. यावर्षी 1 एप्रिल रोजी एकाही प्रशासकीय यंत्रणेवर कोणताही फेक कॉल आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुर्वी या फेक कॉलच्या प्रकाराचा त्रास होत होता. मात्र “ट्रू’ कॉलरमुळे आता कोण फोन करत आहे हे सहज समजते. त्यात समोरची व्यकीत जशी घटना सांगत आहे, त्यावरूनही साधारण अंदाज येतो. त्यामुळे एप्रिल फूलचे प्रमाण नगण्य असून यावर्षी एकही असा फोन आला नाही.

– किरण गावडे , वरीष्ठ अधिकारी, अगिनशामक दल

पोलीस नियंत्रण कक्षाला ब्लॅंक कॉल हे अधुन-मधून येतात. मात्र पोलीस कारवाईला घाबरून फसवे कॉल येणे बंद झाले आहे. यावर्षी तसा एकही अनुभव 1 एप्रिलला आलेला नाही.

– अजय भोसले, पोलीस निरीक्षक, पोलीस नियत्रंण कक्ष

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.