मुंबई – मित्रांसोबत पार्टी सेलिब्रेशन असो या फिरण्याची गोष्ट असो, अभिनेत्री मलायका अरोरो आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घेता येईल हे तिला माहिती आहे. मलायका इंस्टाग्रामवर नेहमीच आपल्या लाईफ चे अप अँड डाऊन अपडेट चाहत्यांशी शेअर करीत असते.
सतत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारी मलायका आपल्या हॉट अँड बोल्ड लूक साठी जोरदार चर्चेत असते. यासोबतच तिचे सुंदर टॅटू सोशल मीडियावर अनेकदा चर्चेचा विषय ठरत असतात.
मलायका अभिनेता अरबाज खान सोबत रिलेशिपमध्ये होते. मात्र, सध्या अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी ही असून, ती देखील प्रचंड ग्लॅमर्स आहे. मलायका प्रमाणेच जॉर्जिया या सुद्धा टॅटूचे वेड असल्याचे दिसून येते.
आज आम्ही तुम्हाला मलायका आणि जॉर्जियाचे वेगवेगळे टॅटू दाखवणार आहोत ते पाहून तुम्हीच ठरवा तुम्हाला कोणाचा टॅटू जास्त आवडतो. अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया तिचे टॅटू फ्लॉन्ट करत फोटो काढताना दिसते. तर दुसरीकडे मलायकाच्या टॅटूंचीही चर्चा होते.
मलायका अरोराने 2014 मध्ये आपल्या कमरेवर एक टॅटू गोंदवला होता. तर जॉर्जियाच्या कमरेवरही कलरफुल टॅटू आहे. इथे देखील या दोघी एकमेकांना टक्कर देत आहेत.
जिथे मलायकाच्या बोटावर आणि हातावर टॅटू आहे, तिथे जॉर्जियाच्या मांडीवर एक रंगीत सुंदर टॅटू आहे. मलायकाने उडणाऱ्या पक्ष्यांच्या टॅटूचे अनेक फोटो शेअर केले आहेत. जिममध्ये जाताना, स्विमिंग करताना तिचा हा टॅटू दिसतो.
मलायकाने तिच्या रिंग फिंगरवर Love लिहिलेला टॅटू गोंदवून घेतला असून, तिच्या मनगटावरही एक टॅटू आहे. तिने मुलाची जन्म तारीख तिने गोंदवून घेतली आहे.
जॉर्जियाच्या एंड्रियानीच्या पायावर एक मोठा लाल फुलपाखराचा टॅटू आहे. आपले हे सर्व टॅटू दाखवण्याची एकही संधी अभिनेत्री सोडत नाही. जॉर्जियाच्या या टॅटूची सर्वत्र तुफान चर्चा असते.