Apurva Gore And Anshuman Joshi : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अपूर्वा गोरे अडकली विवाहबंधनात
Apurva Gore And Anshuman Joshi : या विवाहसोहळ्यात अपूर्वा आणि अंशुमनने पारंपरिक मराठी लूक परिधान केला असून, दोघेही अतिशय सुंदर दिसत आहेत.

Apurva Gore And Anshuman Joshi : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अपूर्वा गोरे विवाहबंधनात अडकली आहे. अभिनेता अंशुमन जोशीसोबत तिने लग्नगाठ बांधली. या खास क्षणाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या विवाहसोहळ्यात अपूर्वा आणि अंशुमनने पारंपरिक मराठी लूक परिधान केला होता. यावेळी दोघेही अतिशय सुंदर दिसत होते. लग्नाच्या फोटोंमध्ये अपूर्वाने हिरव्या रंगाची नऊवारी साडी आणि पारंपरिक दागिने परिधान केले.
तर अभिनेता अंशुमन जोशीने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पिवळ्या रंगाचे धोतर नेसून अस्सल मराठी नवरदेवाचा लूक केला होता. अपूर्वा गोरेनं लग्नाचे फोटो शेअर करत “श्री व सौ… #अपूर्ववंश” असे हृदयस्पर्शी कॅप्शन दिले आहे. अपूर्वा आणि अंशुमनचे हे फोटो पाहून सेलिब्रिटींसह चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, अपूर्वाने तिच्या ग्रहमख आणि मेंहदी सोहळ्याचे सुंदर फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले होते. मेंहदीत तिने नारिंगी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर अंशुमनने तिला मॅचिंग असा लूक केला होता.
या आनंदाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा विधी म्हणून अपूर्वाच्या घरी ‘ग्रहमख’ विधीही अतिशय उत्साहात पार पडला होता. अपूर्वाने या विधीसाठी आईची ४० वर्ष जुनी जांभळ्या रंगाची शालू साडी नेसली होती.
दरम्यान, अभिनेता अंशुमन जोशी २०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘शाळा’ सिनेमात केतकी माटेगावकरसोबत झळकला होता.
हेही वाचा:
saudi arabia on iran: “बस्स झालं आता हल्ला कराल तर….” ; सौदीचा इराणला थेट इशारा




