पंतप्रधानांकडून अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या उपाययोजनांचे कौतुक; म्हणाले…

नवी दिल्ली – देशातील कोरोना संकटामुळे विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियान या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. पंतप्रधानांनी घोषणा केल्यानंतर २० लाख कोटींच्या या आर्थिक पॅकेजमध्ये नक्की काय-काय आहे याबाबत सर्वांच्याच मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. देशवासीयांची उत्सुकता काहीशी कमी करत आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या पॅकेजमधील लघु व मध्यम उद्योगांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची घोषणा केली.
दरम्यान, अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या आत्मनिर्भर भारत अभियान या आर्थिक पॅकेजचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. याबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी, ‘अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणा लघु व मध्यम उद्योगांसाठी महत्वपूर्ण असून येणाऱ्या कालावधीमध्ये त्या उद्योगांसाठी फायद्याच्या ठरतील. या उपाययोजनांमुळे उद्योजक सक्षम होणार असून स्पर्धाभाव वाढीस लागेल.’ असं मत व्यक्त केलं.
Today’s announcements by Finance Minister Nirmala Sitharaman will go a long way in addressing issues faced by businesses, especially MSMEs. The steps announced will boost liquidity, empower the entrepreneurs and strengthen their competitive spirit: PM Narendra Modi (file pic) pic.twitter.com/36p2n6csmz
— ANI (@ANI) May 13, 2020





