लखनऊ : समाजवादी पक्षाने रविवारी माता प्रसाद पांडे यांची उत्तर प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली.पांडे हे सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांची जागा घेतील. ज्यांनी कन्नौजमधून लोकसभेवर निवडून आल्यानंतर करहल मतदारसंघातून आमदारकीचा राजीनामा दिला होता. पांडे हे इटावा येथील समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. उद्यापासूनच उत्तरप्रदेश विधानसभेचे अल्पकालीन अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. पांडे हे अभ्यासू तसेच आक्रमक लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. त्यांच्यावर पक्षाची बाजू सभागृहात उत्तम पद्धतीने लाऊन धरण्याची जबाबदारी आहे. यादव यांनी इटवा येथील सपा आमदार पांडे यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली आहे, असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले.