बीसीसीआयच्या हंगामी सीईओपदी अमिन यांची नियुक्ती
Updated On:

मुंबई – राहुल जोहरी यांनी राजीनामा दिल्याने हंगामी सीईओपदी हेमांग अमिन यांची नियुक्ती करण्यात आल्याचे बीसीसीआयने जाहीर केले आहे. अमिन सध्या बीसीसीआयच्या सीओओ या पदावर कार्यरत आहेत, त्यांच्याचकडे नवा सीईओ नियुक्त होइंपर्यंत ही अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
गेली 3 वर्षे अमिन या पदावर काम करत आहेत. जोहरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा यापूर्वीच दिला होता. मात्र, तो प्रलंबित ठेवण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी बीसीसीआयने जोहरी यांचा राजीनामा मंजूर केला होता. त्यानंतर हे पद रिकामे होते.





