पुणे | नवोदय प्रवेश निवड परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
Updated On:

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- नवोदय विद्यालय समितीच्या वतीने इयत्ता ९ वी आणि ११ वी प्रवेशासाठी ८ फेब्रुवारी २०२५ रोजी निवड चाचणी परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी अॉनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरु झालेली आहे.
प्रवेश अर्ज भरताना उमेदवारांनी त्यांचे छायाचित्र, स्वाक्षरी, पालकांची स्वाक्षरी, शैक्षणिक मार्कशीट, वैध फोटो आयडी अपलोड करणे आवश्यक आहे.
इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज नोंदणी करणे आवश्यक आहे.
प्रवेश निवड चाचणी परीक्षा ही सकाळी ११ ते दुपारी १.३० पर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. या निवड परीक्षेचा कालावधी २ तास ३०मिनिटांचा असेल.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त वेळ दिला जाईल. प्रवेश परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश असेल. एकूण १०० प्रश्न असणार आहेत.



