Apple ने ग्राहकांना दिले खास सरप्राइज, लाँच केले ‘हे’ दोन डिव्हाइस, किंमत फक्त 35 हजारांपासून सुरू

Apple iPad Air (2025) | टेक कंपनी अॅपलने ग्राहकांना खास सरप्राइज देत दोन नवीन आयपॅड लाँच केले आहेत. Apple ने M3 चिपसह नवीन iPad Air आणि A16 चिपसेटसह 11th जनरेशन iPad सादर केला आहे. कंपनीने नवीन iPad Air (2025) ला 11-इंच आणि 13-इंच व्हेरिएंटमध्ये, तर, iPad 11 ला 11 इंच डिस्प्लेसह लाँच केले आहे. या दोन्ही आयपॅडच्या किंमत, फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
iPad Air (2025) चे फीचर्स
iPad Air (2025) मध्ये 11 इंच आणि 13 इंचाचे डिस्प्ले पर्याय उपलब्ध आहेत. 11 इंचाच्या मॉडेलमध्ये 2360 x 1640 पिक्सल रिझोल्यूशन आणि 500 निट्स पीक ब्राइटनेससह येणारा लिक्विड रेटिना डिस्प्ले दिला आहे.
13 इंचाच्या मॉडेलमध्ये 2732 x 2048 पिक्सल रिझोल्यूशन आणि 600 निट्स पीक ब्राइटनेससह लिक्विड रेटिना डिस्प्ले मिळेल. दोन्ही व्हेरिएंट्समध्ये फिंगरप्रिंट रेसिस्टंट कोटिंग, ट्रू टोन कलर आणि Apple Pencil साठी सपोर्ट देखील आहे. प्रोसेसरच्या बाबतीत, नवीन iPad Air मध्ये Apple ची अत्याधुनिक M3 चिप वापरली आहे.
दोन्ही व्हेरिएंट्समध्ये 1TB पर्यंत स्टोरेज पर्याय मिळतो. यात iPad Air रियरला 12MP चा वाइड-अँगल कॅमेरा दिला आहे, जो 5x डिजिटल झूम आणि स्मार्ट HDR ला सपोर्ट करतो. समोरच्या बाजूस 12MP चा सेंटर स्टेज कॅमरा आहे, जो लँडस्केप मोडमध्ये सेट केला जातो. याद्वारे ज्यामुळे व्हीडिओ कॉलिंगचा चांगला अनुभव मिळेल. iPad Air च्या दोन्ही वेरिएंट्समध्ये USB टाइप-C पोर्ट आहे कंपनीचा दावा आहे की, याची बॅटरी 10 तासांपर्यंत टिकेल.
iPad 11 चे स्पेसिफिकेशन्स
iPad 11 मध्ये 2360 x 1640 पिक्सल रिझोल्यूशन आणि 500 निट्स पीक ब्राइटनेससह येणारा 11 इंच लिक्विड रेटिना डिस्प्ले आहे. आयपॅड A16 चिपसेटसह येतो. यामध्ये 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज वेरिएंट उपलब्ध आहे.
कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर मागील बाजूस 5x डिजिटल झूमसह 12MP वाइड-अँगल कॅमेरा आहे. तर फ्रंटला व्हीडिओ कॉलिंगसाठी 12 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. iPad 11 iOS 18 वर काम करतो. यामध्ये चार्जिंगसाठी USB टाइप-C पोर्ट आहे आणि Wi-Fi वर इंटरनेट वापरताना याची बॅटरी 10 तासांपर्यंत टिकते.
iPad Air (2025) आणि iPad 11 ची किंमत
iPad Air (2025) च्या 11 इंच Wi-Fi मॉडेलची किंमत 54,900 रुपये पासून सुरू होते. Wi-Fi + Cellular मॉडेलची किंमत 74,900 रुपये पासून सुरू होईल. iPad Air (2025) च्या 13 इंचच्या Wi-Fi मॉडेलची किंमत 79,900 रुपये आहे. तर याचे Wi-Fi + Cellular मॉडेल 94,900 रुपये किंमतीपासून उपलब्ध आहे.
11th Gen iPad च्या Wi-Fi मॉडेलची किंमत 34,900 रुपये पासून सुरू होते. तसेच, त्याच्या Wi-Fi + Cellular मॉडेलची सुरुवाती किंमत 49,900 रुपये आहे. या दोन्ही डिव्हाइसह मॅजिक कीबोर्डला भारतीय ग्राहक 12 मार्चपासून खरेदी करू शकतात.





