Apple ने 1 लाखांच्या बजेटमध्ये लाँच केला नवा लॅपटॉप, फीचर्स खूपच जबरदस्त; 10 हजारांच्या डिस्काउंटसह करा खरेदी

MacBook Air M4 | टेक कंपनी Apple ने मागील काही दिवसात अनेक नवीन डिव्हाइस लाँच केले आहेत. कंपनीने काही दिवसांपूर्वीच नवीन आयपॅडला भारतीय बाजारात सादर केले होते. आता कंपनीने M4 चिपसेट असलेल्या MacBook Air ला बाजारात आणले आहे. कंपनीचा दावा आहे की, या मॅकबुकला एकदा चार्ज केल्यास 18 तास वापरता येईल. यासोबतच, कंपनीने Mac Studio लाइनअपला M3 Max आणि M3 Ultra चिपसेटसह लाँच केले आहे.
MacBook Air M4 चे स्पेसिफिकेशन्स
MacBook Air M4 ला कंपनीने MagSafe चार्जर केबलसह सादर केले आहे. यामध्ये 8 कोर आणि 10 कोर असलेल्या M4 प्रोसेसरचा पर्याय उपलब्ध आहे. कंपनीनुसार, या डिव्हाइसचा स्पीड M1 प्रोसेसरच्या तुलनेत दुप्पट आहे. तसेच, सिंगल चार्जवर मॅकबुकची बॅटरी 18 तास टिकेल.
या डिव्हाइसमध्ये Apple Intelligence नुसार तंत्रज्ञान वापरले आहे. यामध्ये ग्राहकांना 512GB पर्यंत स्टोरेज पर्याय मिळतो. तसेच, यात macOS Sequoia दिले आहे, जे Apple Intelligence ला सपोर्ट करते. यात 12MP चा सेंटर स्टेज कॅमेरा देखील दिला आहे.
13-inch स्क्रीन असलेल्या मॉडेलमध्ये 53.8Whr ची बॅटरी दिली असून, यासोबत 30W चा अडॅप्टर मिळतो. तर, 15-inch स्क्रीन असलेल्या व्हेरिएंटमध्ये 66.5Whr ची बॅटरी मिळते, ज्यासोबत 35W चा चार्जिंग अडॅप्टर दिला आहे. दोन्ही व्हेरिएंट्स टाइप-C चार्जिंग पोर्टसह येतात आणि 70W पर्यंत फास्ट चार्जिंग सपोर्ट करतात.
MacBook Air M4 ची किंमत
नवीन MacBook Air M4 13-inch आणि 15-inch स्क्रीनसह उपलब्ध आहे. याची किंमत 99,900 रुपये पासून सुरू होते. तुम्ही मॅकबुकला स्काय ब्लू, मिडनाइट, स्टारलाइट आणि सिल्वर रंगात खरेदी करू शकता. तर Mac Studio ला कंपनीने 2,14,900 रुपये सुरुवाती किंमतीत लाँच केले आहे. Mac Studio फक्त सिल्वर रंगात उपलब्ध आहे. MacBook Air आणि Mac Studio चे प्री-बुकिंग सुरू झाले असून, ग्राहक 12 मार्चपासून याची खरेदी करू शकतात. मॅकबुक एअर एम14 वर 10 हजार रुपयांपर्यंत बँक डिस्काउंटचाही फायदा मिळेल.





