राहुल गांधी, सीताराम येच्युरींना कोर्टात हजर करा : ठाणे येथील न्यायालयाचा आदेश

ठाणे सत्र न्यायालयाने आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते सीताराम येचुरी यांना ३० एप्रिल रोजी न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की आरएसएसचे स्वयंसेवक असलेल्या विवेक चंपानेरकर यांनी राहुल गांधी व सीताराम येच्युरी यांच्याविरोधात ‘आरएसएस’ची बदनामी करीत असल्याचा दावा ठोकला होता.

या याचिकेद्वारे चंपानेरकरांनी राहुल गांधी व सीताराम येच्युरी हे पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरएसएसचा हात असल्याचा खोटा प्रचार करीत असल्याचा आरोप देखील केला आहे. दरम्यान, आज याबाबत सुनावणी करताना ठाणे येथील एका न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते सीताराम येचुरी यांना न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.