मिलिटरी कँटिनच्या नोव्हेंबर महिन्यातील कामकाजाबाबत आवाहन

सातारा : येथील मिलिटरी कँटिन नोव्हेंबर महिन्यात दि. १ व ३ रोजी दीपावली सुट्टी, दि. ४ व ५ रोजी मासिक स्टॉक टेकिंग, दि. २० रोजी मतदानादिवशी तसेच, दि. १२, १९, २६ मंगळवार साप्ताहिक सुट्टीमुळे बंद राहील. दि. २३ रोजी ड्राय डे निमित्त मद्य विक्री बंद राहील; परंतु ग्रोसरी विक्री सुरु राहील, अशी माहिती व्यवस्थापक, निवृत्त कमांडर राजेंद्र शिंदे यांनी दिली.
आपण कोणत्याही तालुक्यातील रहिवासी असला तरी कोणत्याही दिवशी कॅन्टिनमध्ये ग्रोसरी व लिकर घेण्यासाठी येवू शकता. ज्या कार्डधारकांना ऑथॉरिटी लेटर दिले आहे त्या कार्डधारकाचे लिकर लायसेन्स (परवाना) येणाऱ्या व्यक्तीपाशी असणे बंधनकारक आहे. ज्यांच्यापाशी लिकर परवाना नसेल त्यांना लिकर दिली जाणार नाही. जे वृद्ध कार्डधारक येऊ शकत नाहीत त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क केल्यानंतरच त्यांच्यावतीने आलेल्यांना प्रवेश दिला जाईल; परंतु त्यांच्यापाशी लिकर परवाना असणे बंधनकारक आहे.
कार्डधारकांनी आर्मी नंबर, नाव, रैंक, मोबाइल नंबर डाटा कोणत्याही अनोळखी व्यक्तींना सांगू नये. कँटिन कोणासही फोन करून, कोणत्याही वस्तू ऑर्डर करत नाही. सर्व कार्डधारकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन राजेंद्र शिंदे यांनी केले आहे.





