Dakkait Teaser : गेल्या अनेक दिवसांपासून ‘डकैत’ चित्रपटाच्या टीझरची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर या अॅक्शपॅक चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित चित्रपट म्हणून डकैतकडे पाहिले जाते. या चित्रपटात बॅालीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि अभिनेता अदिवी शेष यांची फ्रेश जोडी झळकली आहे. या चित्रपटाचा टीझर तेलूगु भाषेत प्रदर्शित करण्यात आला असून, टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील मृणाल आणि अदिवी यांचा लूक लक्ष वेधून घेत आहे. मृणाल ठाकूर नेहमीच्याच अंदाजात दिसत असून अॅक्शन करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे चित्रपटात नकारात्मक भूमिकेत बॅालीवूडमधील निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यम आहे. त्याची झलक टीझर संपतेवेळे दाखविण्यात आली आहे. याशिवाय चित्रपटात प्रकाश राज आणि मराठी कलाकार अतुल कुलकर्णी यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तेव्हापासून चित्रपटाविषयी चर्चा सुरू होती. एक प्रेम कथा अशी टॅगलाइन चित्रपटाला देण्यात आली आहे. यामुळे आता डकैतमध्ये लव्हस्टोरी असणार हे निश्चित असले तरी चित्रपटाचे वेगळेपणे काय असणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. डकैत हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा टीझर पाहून चाहत्यांना प्रदर्शनाची उत्सुकता लागली आहे. सध्या बॅाक्स अॅाफिसवर धुरंधर चित्रपटाची हवा असून, कमाईच्या बाबतीत चित्रपटाने अनेक रेकॅार्ड मोडले असून यशस्वी घोडदौड कायम ठेवली आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग धुरंधर २ मार्चमध्ये प्रदर्शित होणार असल्याने डकैत या चित्रपटासमोर कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा : Tu Meri Main Tera Trailer: कार्तिक आर्यन-अनन्या पांडेच्या ‘तू मेरी, मैं तेरा’चा ट्रेलर प्रदर्शित; प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया