28 रुग्णांचा मृत्यू; 885 जण करोनामुक्त
पुणे -दिवसभरातील करोनाबाधितांची संख्या 2 हजार 752 झाली असून, मृतांची संख्याही वाढली आहे. एवढेच नव्हे तर शहरातील एकूण मृतांची संख्या पाच हजारांपेक्षा जास्त झाली आहे. गुरुवारी तिनही विभागात रेकॉर्ड ब्रेक झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
बाधितांची संख्या 15 फेब्रुवारीपासून वेगाने वाढतच आहे. परंतु, त्यामानाने मृतांची संख्या आटोक्यात होती. मात्र, गुरुवारी 28 बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून, एकूण मृतांची संख्या आता 5 हजार 2 झाली आहे.
आजपर्यंत शहरात 12 लाख 86 हजार 761 संशयितांच्या स्वॅब टेस्ट करण्यात आल्या. त्यातील 2 लाख 26 हजार 549 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 16 हजार 887 ऍक्टिव्ह बाधित असून त्यातील 440 जणांची प्रकृती गंभीर आहे. तर, 846 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
आजपर्यंत 2 लाख 4 हजार 670 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून, त्यात गुरुवारी घरी सोडलेल्या 885 जणांचा समावेश आहे. एका दिवसात 11 हजार 835 संशयितांची टेस्ट करण्यात आली.