Anurag Kashyap | चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिला आहे. यातच आता त्याने एक मोठा निर्णय घेतला आहे. चांगल्या कलाकृतींच्या निर्मितीसाठी मुंबई सोडून दाक्षिणात्य सिनेसृष्टीकडे जाण्याचा विचार करत असल्याचा खुलासा त्याने केला. इतकेच काय तर बॉलिवूड इंडस्ट्री, चित्रपट निर्माते, टॅलेंट एजन्सी आणि आताच्या कलाकारांच्या कामाची पद्धतीवरून प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने ताशेरे ओढले आहे.
अनुराग कश्यप हॉलीवूड रिपोर्टरशी बोलताना म्हणाला की ,“आता बाहेर जाऊन प्रयोग करणं माझ्यासाठी अवघड आहे. कारण त्यासाठी खूप पैसा लागतो. निर्माते नफा आणि मार्जिनचा विचार करतात. चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्याआधी, तो कसा विकायचा हे ठरतं. त्यामुळे चित्रपट निर्मितीचा आनंद राहत नाही. म्हणून मला पुढच्या वर्षी मुंबईबाहेर जायचं आहे. मी दक्षिणेत जाणार आहे. मी या इंडस्ट्रीमुळे खूप निराश झालो असून वैतागलो आहे.” Anurag Kashyap |
“आधीच जे हिट झालंय त्याचेच रिमेक बनवायचे सध्या अशी मानसिकता आहे. ते काहीही नवीन करण्याचा प्रयत्न करणार नाहीत. नवीन प्रतिभा शोधण्यापेक्षा नफ्याला प्राधान्य दिलं जातं, असं मत त्याने मांडलं. एजन्सी असंच करते. ते फक्त तुमच्याकडून पैसे कमवतात. ते नवीन लोकांचे करिअर तयार करण्यासाठी गुंतवणूक करत नाहीत. त्यांना नवीन कलाकारांना इंडस्ट्रीत पुढे जाऊ द्यायचं नाही. ते त्यांना अभिनयाच्या कार्यशाळेत पाठवण्याऐवजी जिममध्ये पाठवतात,” असं अनुराग कश्यप म्हणाला. Anurag Kashyap |
अनुरागने अशा कलाकारांबद्दल निराशा व्यक्त केली, “सुकुमारसारखे दिग्दर्शकच ‘पुष्पा’सारखा चित्रपट बनवू शकतात. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत दिग्दर्शकांमध्ये गुंतवणूक केली जाते आणि त्यांना चित्रपट बनवण्यास सक्षम केलं जातं. इथे प्रत्येकजण विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा तुम्ही विश्व निर्माण करता, तेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्हीच देव आहात.” Anurag Kashyap |
दरम्यान, अनुरागने देव डी, गुलाल, गँग्स ऑफ वासेपूर, रमन राघव, मनमर्जियां, दोबारा यांसारखे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले. गँग्स ऑफ वासेपूरमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली.