António Guterres : संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस (António Guterres) यांनी इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील युद्धविरामाच्या घोषणेचे स्वागत केले आहे. तसेच हा करार घडवून आणण्यात अमेरिकेने बजावलेल्या भूमिकेची प्रशंसा केली. या युद्धविरामामुळे संघर्षावर दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी वाटाघाटींचा मार्ग मोकळा होईल आणि या प्रदेशात चिरस्थायी व सर्वसमावेशक शांतता प्रस्थापित करण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना हातभार लागेल, अशी आशा गुटेरेस (António Guterres) यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये व्यक्त केली. António Guterres गुटेरेस (António Guterres) यांनी सर्व पक्षांना युद्धविरामाचे पालन करण्याचे, युद्धविरामाचा पूर्ण आदर करण्याचे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे नेहमी पालन करण्याचे आवाहनही केले. वॉशिंग्टन, तेल अवीव आणि बैरुत यांच्यात झालेल्या वाटाघाटींनंतर १० दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा झाली. त्यानंतर इस्रायल-लेबनॉन सीमा स्थिर करण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राजनैतिक प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर गुटेरेस यांनी हे आवाहन केले.