Jaya Bachchan video : जया बच्चन यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल; वृद्ध महिलेचा हात झिडकारला, कारण काय?

Jaya Bachchan video : नुकताच जेष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. संसद भवनाच्या परिसरात एक व्यक्ती त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतो मात्र, ही गोष्टी जया बच्चन यांना खटकते. त्यांना राग अनावर होतो आणि त्या संबंधित व्यक्तीला त्या जोरदार धक्का देतात.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जया बच्चन यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली होती. तसेच अभिनेत्री आणि खासदार कंगणा रानौवत हिने देखील जया बच्चन यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. अशातच आता जया बच्चन यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओ दिवंगत अभिनेते मनोज कुमार यांच्या प्रार्थना सभेतला आहे. यादरम्यान जया बच्चन या एका महिलेवर रागवताना दिसत आहेत. त्यांनी त्या महिलेचा हात झटकल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्या कृतीला टीकेतून लक्ष केलं आहे. तर काहींनी समर्थनही दर्शवलं आहे. या महिलेनं एक फोटो मागितल्यामुळे जया बच्चन रागावल्या असल्याचं समजतं. त्यांचं हे वागणं आता अनेकांना खटकलं असून त्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
View this post on Instagram
नेमकं काय घडलं?
व्हिडीओमध्ये एक वृद्ध महिला जया बच्चन यांच्याकडे येते आणि त्यांना मॅम म्हणून हाक मारते. यावेळी जया बच्चन मागे वळून पाहतात. यावेळी एक पुरुष त्याच्या मोबाईलमध्ये दोघींचा फोटो काढण्याचा प्रयत्न करतो. ती महिला हात मिळविण्यासाठी जया बच्चन यांच्याकडे येते, तेव्हा जया त्या महिलेचा हात जोरात झटकतात.
नेटकरी काय म्हणाले?
जया बच्चन यांचा हा व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्या कृतीवर टीका केली आहे, तर काहींनी त्यांच्या वागण्याचं समर्थन केलं आहे. जया शांतपणे बोलू शकल्या असत्या, असं एका युजरने लिहिलं आहे, तर दुसऱ्या एका युजरने लिहिले, “मला माफ करा, पण अंत्यसंस्कारात फोटो मागण्यासाठी योग्य जागा आहे का? असा सवाल केला आहे.
हेही वाचा : ‘एक मिनिट ऐकायला शिक…कागद दिलंय ना’, बीडमध्ये अजित पवारांनी समर्थकाला झापलं





