Shantilal Suratwala passes away : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आणखी एका नेत्याचे निधन झाले आहे. पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे आज पहाटे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच पुणे शहरात शोककळा पसरली आहे. शांतीलाल हे ७६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. गेल्या काही काळापासून शांतीलाल हे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार सुरू होते. मात्र, त्यांची या आजाराशी झुंज आज अपयशी ठरली आणि त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे पुणे शहराच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हेही वाचा : Top 10 news : अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, “मूड ऑफ द नेशन”सर्वेतही भाजपची सरशी” अशा टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर शांतीलाल सुरतवाला यांचा राजकीय प्रवास १९७९ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीने सुरू झाला. सिटी पोस्ट वॉर्डातून त्यांनी पहिली निवडणूक लढवली आणि जिंकली. १९७९ ते २००७ या प्रदीर्घ काळात त्यांनी नगरसेवक आणि महापौर म्हणून काम पाहिले. शांतीलाल सुरतवाला हे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांचे अत्यंत विश्वासू नेत्यांपैकी एक होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधानाने पुणे शहरात कडकडीत बंद आणि दुखवटा पाळला जात असतानाच आज सकाळी शांतीलाल सुरतवाला यांच्या निधनाने पुणेकरांवर दुहेरी दुःखाचा डोंगर कोसळला असून, हळहळ व्यक्त केली जात आहे. एक संयमी, अभ्यासू आणि विकासकामे तडीस नेणारा नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. हेही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीणींंना दिलासा? जानेवारी महिन्याच्या हप्ता संदर्भात अपडेट समोर