पीएमपीएमएलच्या आणखी एका कर्मचाऱ्यास करोनाची लागण
Updated On:
पुणे – पीएमपीएमएलच्या न. ता. वाडी डेपोतील एका कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. त्याचा अहवाल पाझिटिव्ह आला आहे. दरम्यान, पीएमपीएमएलमधील करोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या चार झाली आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपीएमएल) नतावाडी डेपोतील कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाल्याचा अहवाल शुक्रवारी आला. संबंधित कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, सदर कर्मचारी गेल्या पंधरा दिवसांपासून कामावर उपस्थित नव्हता. मात्र, हा कर्मचारी काही वैयक्तीक कामानिमित्त मागील पाच दिवसांपूर्वी स्वारगेट येथील मध्यवर्ती कार्यालयात आला होता. त्यामुळे, खबरदारीचा उपाय म्हणून मध्यवर्ती कार्यालयाचे निर्जंतुकीकरण केले आहे.





