दिल्लीतील आणखी एक घटना समोर; INA मार्केटमधील फास्ट फूड रेस्टॉरंटला भीषण आग, अनेक जण जखमी

Delhi Fire| दिल्लीच्या जुन्या राजेंद्र नगरमध्ये नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या राव आयएएस स्टडी सेंटरच्या तळघरातील लायब्ररीमध्ये पाणी साचल्याने दोन मुली आणि एका मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दिल्लीतील एका रेस्टॉरंटमध्ये सोमवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
चार ते सहा जण जखमी
आयएनए मार्केटमधील एका फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. या अपघातात 4 ते 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.
Delhi: Fire breaks out at restaurant in INA market, 4-6 people injured
Read @ANI Story | https://t.co/YWo7a25T3x#Delhi #fire #INAMarket pic.twitter.com/YvciZEsIsg
— ANI Digital (@ani_digital) July 29, 2024
आगीचे कारण अस्पष्ट
ही घटना सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. यावेळी दुकाने बंद करून कर्मचारी झोपले होते. मात्र आग लागल्याचे समजेपर्यंत आगीने भीषण रूप धारण केले होते. जखमी झालेल्या काही लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या आगीचे कारणही समजू शकलेले नाही. Delhi Fire|
दिल्ली अग्निशमन सेवेचे एसटीओ मनोज मेहलावत यांनी सांगितले की, “आम्हाला सोमवारी पहाटे 3.20 वाजता आग लागल्याची बातमी मिळाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आले. दोन दुकानांना आग लागली असून चार ते सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे. फास्ट फूड रेस्टॉरंटच्या मालकाचाही जखमींमध्ये समावेश आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र रेस्टॉरंटमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त व्यावसायिक सिलिंडर ठेवले होते, यामुळे स्फोटही होऊ शकला असता.” Delhi Fire|
हेही वाचा:
Paris Olympics 2024 (Swimming) : भारताचे जलतरणातील आव्हान संपुष्टात…





