Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसताना छत्रपती संभाजीनगरजवळ आणखी एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गवरील जांबरगाव शिवारात भरधाव कारने पुढे चाललेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार सुमारे 100 फूटांपर्यंत फरफटत गेल्याची माहिती समोर आली आहे. Samruddhi Expressway अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. कारमधील दोन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र चालकाचे पाय अडकले असल्यामुळे त्याला बाहेर काढण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. Samruddhi Expressway Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात! एकाचा आगीत होरपळून दुर्देवी अंत; दोघे बजावले दरम्यान, बचावकार्य सुरू असतानाच कारने अचानक पेट घेतला आणि काही क्षणांतच मोठी आग लागली. या भीषण आगीत चालक पवन अजमेरा (वय 52) यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. Samruddhi Expressway या अपघातात ईशा अजमेरा आणि विना अजमेरा हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. Samruddhi Expressway हेही वाचा : Top 10 News: जमिनींचे डबल रेकॉर्ड बंद ते चीनचा अमेरिकेला इशारा; जाणून घ्या आजच्या Top 10 news